अभ्यासू, मार्गदर्शक नेतृत्व हरपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी मंत्री

0

 

मुंबई: अभ्यासू, मार्गदर्शक नेतृत्व हरपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी मंत्री. विलासराव पाटील- उंडाळकर यांना श्रद्धांजली. राज्याच्या सहकार, ग्रामविकास या क्षेत्रांसह सामान्यांच्या जीवनाशी निगडीत महत्वपूर्ण विषयांतील अभ्यासू आणि मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, स्वातंत्र्यसेनानी कुटुंबांचा वारसा जपत विलासकाका यांनी सुरू केलेली राजकीय वाटचाल समाजकारणाशी जोडलेली होती. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळून सहकार, ग्रामविकास, जलसंधारण या क्षेत्रात भरीव काम केले. अनेक संस्था आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी जाणीवपूर्वक बळ दिले. विविध विषयांतील गाढा अभ्यास आणि परखडपणामुळे ते अनेकांसाठी मार्गदर्शक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारण-समाजकारणातील दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विनम्र श्रद्धांजली.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech