45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता -महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती

0

मुंबई : बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’ कडून शिफारसप्राप्त 45 उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विभागातील 45 रिक्त पदे भरण्यासाठी मागणी पाठविली होती. त्यानुसार आयोगाकडून 45 बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) पदांसाठी शिफारशी प्राप्त झाल्या होत्या. या 45 रिक्त पदांवर शिफारसप्राप्त उमेदवारांची नियुक्ती करण्यास श्रीमती ठाकूर यांनी मान्यता दिली.
  ठाकूर या महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेत आहेत. त्यादरम्यान विभागातील मनुष्यबळ, रिक्त पदे, साधनसामुग्री तसेच विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक बाबींची माहिती देखील त्या घेत आहेत. विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावा
या दृष्टीने आगामी काळात विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
०००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech