मंत्रालय परिसरात महानंद आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्घाटन

0

 

मुंबई :मंत्रालय परिसरात महानंद आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्घाटन. मंत्रालय परिसरातील आरसा गेटजवळ महानंद आणि आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

मंत्रालयातील हा स्टॉल स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक तयार करण्यात आलेला आहे. महानंद आणि आरे यांनी उत्पादन केलेली आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दर्जाची दुग्ध उत्पादने या स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीची सुरुवात राज्याच्या राजधानीपासून करण्यात आली असून राज्यातही दोन्ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच. पी. तुम्मोड, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष वामनराव देशमुख, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक शामसुंदर पाटील यांच्यासह महानंदचे आणि आरेचे सर्व व्यवस्थापक कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech