मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने बोलकी हास्यचित्रे रेखाटणारा व्यंगचित्रकार गमावला -विनोद तावडे

0

 

 

मुंबई, दि. 11 : मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने साध्या,सोप्या चित्रसंकल्पनांच्या माध्यमातून बोलकी हास्य चित्रे रेखाटणारा व्यंगचित्रकार गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या शोकसंदेशात श्री. तावडे यांनी नमूद केले आहे की, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी नेहमी साध्या सोप्या शैलीत चित्रसंकल्पना व्यंगचित्राच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडल्या, त्यातून त्यांनी स्वतःची शैली आणि वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यंगचित्राबरोबरच त्यांनी विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून ललित लेखन करतानाच काही पुस्तकेही लिहिली. व्यंगचित्रे आणि लिखाणाबरोबरच सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होणाऱ्या मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने या क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे श्री. तावडे यांनी म्हटले आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech