माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढ्यात, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे नेतृत्व गमावले – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

0

 मुंबई:  माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे महत्त्वाचे नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

          उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे नेतृत्व हे संघर्षातून निर्माण झाले होते. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी संघर्ष केला. सामाजिक, वैचारिक बांधिलकी जपणारे निष्ठावान नेतृत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech