महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यासाठी निर्भया फंडातील निधीचा सुयोग्य वापर करावा – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

0

 

मुंबई:महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यासाठी निर्भया फंडातील निधीचा सुयोग्य वापर करावा.  महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यासाठी निर्भया फंडमधून प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुयोग्यपणे करावा तसेच महिलांसाठी असलेल्या विविध योजनांकरिता निधी उपलब्ध करुन घेण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिल्या.

महिला व बालविकास विभागांतर्गत निर्भया योजनेकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक झाली. यावेळी बालविकास विभाग आयुक्त इंदिरा मालोजैन, महिला व बालविकास सचिव आय.ए.कुंदन, विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव श्री.मंत्री, उपायुक्त रवी पाटील उपस्थित होते.

निर्भया फंडांतर्गत उपलब्ध असलेला निधी राज्यांना वितरीत करण्याबाबत केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने निर्धारित केलेले निकष व त्याबाबतची कार्यपध्दती यावेळी विषद करण्यात आली. तसेच सद्यस्थिती महाराष्ट्र राज्यासाठी निर्भया फंडामधून प्राप्त होणारा निधी महिलांच्या योजनेसाठी वापराव्यात येईल. याची चर्चा करुन निर्णय घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी ‘सीएसआर’ बाबतही आढावा घेण्यात आला. सीएसआर निधीतून जुन्या अंगणवाड्या दुरुस्त करणे, नव्या अंगणवाड्या बांधणे याबाबत चर्चा झाली. बाल धोरण ठरविण्याबाबत व सुधारणा करण्याबाबतही आढावा घेण्यात आला.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech