महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा विभागीय स्तरावर आढावा घेणार

0

मुंबई : महिला व बालविकास विभागासंदर्भात असणाऱ्या योजनांचा व कामकाजाचा विभागीय पातळीवर आढावा घेणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजनांचे सादरीकरण सह्याद्री आथितिगृह येथे करण्यात आले. महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी कार्यभार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आढावा बैठक घेऊन कामकाजास सुरुवात केली.

राज्यगृहे व संरक्षणगृहे, निराश्रीत स्त्रियांसाठी प्रशिक्षण केंद्र, आधारगृहे चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान, विविध व्यवसायभिमुख शिक्षण घेणाऱ्या महिलांना विद्यावेतन, देवदासी व त्यांच्या मुलांचे शिक्षण पुनर्वसन, स्वयंसिद्धा योजना, कामधेनू योजना व अन्य योजनांचे सादरीकरण विभागाद्वारे करण्यात आले.

शासकीय बालगृहे व निरीक्षण गृहे, निराश्रीत बालकांसाठी संस्थेतर सेवा (बालसदन बालकाश्रम), बालगृहे व जोपासना, अनाथालये व राष्ट्रीय शिशु कक्ष निधी अंतर्गत केंद्रिय अनुदान प्राप्त पाळणाघर योजना या सर्व बालविकासासंदर्भातील योजनांचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले.

विविध विभागांची सद्यस्थिती सुरु असलेले कार्य व योजना यांची सविस्तर माहिती घेऊन विकासकामांच्या दृष्टीने उपाययोजनांच्या सूचना मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिल्या. सादरीकरणानंतर मंत्री श्रीमती ठाकूर यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी महिला व बालविकास सचिव आय. ए. कुंदन, आयसीडीएस आयुक्त इंद्रा मालो तसेच बालहक्क आयोगाचे अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, ‘माविम’ तथा महिला व बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech