महात्‍मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्‍यपालांच्या उपस्थितीत दीपोत्सव

0

 

वर्धा : महात्‍मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्‍यपालांच्या उपस्थितीत दीपोत्सव. काळानुरूप महात्‍मा गांधीचे विचार आपल्यासाठी अधिकच प्रासंगिक होत आहेत. गांधीजी हे धर्म, पंथ आणि देशाच्या सीमांपलीकडे सर्व जगाकरिता सर्वमान्‍य नेता होते. त्यांनी आपल्या जीवन प्रवासातून सत्‍य व अहिंसा हा संदेश दिला. गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,असे प्रतिपादन महाराष्‍ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले.

वर्धा येथील हिंदी विश्‍वविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यक्रम व उपक्रमांची प्रशंसा करत विविध उपक्रमातून गांधीजींचा संदेश जनमानसात पोचविला जात आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
महात्‍मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्‍यपालांच्या उपस्थितीत दीपोत्सव.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्‍टोबर रोजी महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय आणि नागरिक समिती वर्धा यांच्या वतीने वर्धा शहरात भव्य दीपोत्‍सव साजरा करण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून गांधीजींना एका आगळ्या-वेगळ्या पध्दतीने वर्धेकरांकडून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व राजस्थान चे राज्यपाल कलराज मिश्र यांनी महाराष्ट्र व राजस्थान येथील राजभवनातून दीप प्रज्ज्वलित करुन दीपोत्सवाचा शुभारंभ केला.

महात्‍मा गांधी यांच्या 151 व्या  जयंतीनिमित्त  राज्‍यपालांच्या उपस्थितीत दीपोत्सव

विद्यापीठाच्या गालिब सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल भगत सिंह कोश्‍यारी, राजस्‍थानचे राज्‍यपाल कलराज मिश्र तसेच विश्वविद्यालयाचे कुलाधिपति प्रो. कमलेश दत्‍त त्रिपाठी यांनी ऑनलाइन उपस्थित राहून दीपोत्सवाचे उदघाटन केले.

याप्रसंगी सभागृहात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते. राजस्‍थानचे राज्‍यपाल कलराज मिश्र यांनी गांधीजींची कर्मभूमी वर्धा येथून जगात अहिंसा व शांततेचा संदेश प्रसारित झाला पाहिजे असे सांगून गांधीजींचा सर्वोदय विचार आजची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी विश्‍वविद्यालयाचे अध्‍यापक डॉ. लेखराम दन्‍नाना द्वारा संस्‍कृतमध्ये भाषांतरित ‘मंगल प्रभात’ या पुस्‍तकाचे ई-लोकार्पण केले.

कुलाधिपती प्रो. कमलेश दत्‍त त्रिपाठी यांनी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांचे कर्तृत्व अनुकरणीय असून तळागाळातील माणसाला सशक्‍त करण्यासाठी गांधी मार्ग सदैव उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्री सुनील केदार म्हणाले की, महात्‍मा गांधी यांनी प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याची शिकवण दिली. दीपोत्सवाचे आयोजन हे जिल्ह्यासाठी अनोखे आहे. यातून मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत प्रसारित करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांनी दीपोत्‍सवातून गांधीजीचे तत्वज्ञान दर्शन व चिंतन यांचा प्रकाश सर्वत्र प्रसारित होईल, असा विश्वास व्यक्त केला.

शहरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक सघटनांनी चौका चौकात मातीपासून तसेच गायीच्या शेणापासून बनविलेले दीप लावून गांधी जयंती निमित्त दीपोत्सव साजरा केला.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech