महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

0

 

मुंबई : महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन. आदिकवी, महाकाव्य ‘रामायणा’चे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. महर्षीं वाल्मिकींनी प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रातून आपल्याला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाल्मिकी जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, श्रीरामांच्या जीवनचरित्राप्रमाणेच महर्षी वाल्मिकींच्या जीवनातूनही खूप काही शिकण्यासारखे आहे. मोह, मत्सर, हिंसा, अहंकार, असत्यातून काहीही साध्य होत नाही. हिंसेचा, असत्याचा हा मार्ग सोडून सत्य, शांतीच्या मार्गावरुन चालण्यात, कर्तव्यांचे पालन करण्यातच जीवनाचे सार्थक आहे. महर्षी वाल्मिकींनी प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रातून दिलेला विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी महर्षी वाल्मिकींच्या विचारांचे स्मरण करुन त्यांना वंदन केले आहे. सर्वांना वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech