महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे 2020 ची परतफेड दि.23 ऑक्टोबर 2020 रोजी

0

मुंबई: महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे 2020 ची परतफेड दि.23 ऑक्टोबर 2020 रोजी. महाराष्ट्र शासन , वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ – 10.17 / प्र.क्र .61 / अर्थोपाय दि. 18 ऑक्टोबर 2017 अनुसार 6.81 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज रोखे, २०२० (ऑक्टोबर ) अदत्त शिल्लक रकमेची दि. 24 ऑक्टोबर, २०२० पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि . 23 ऑक्टोबर, २०२० रोजी (दि. 24 ऑक्टोबर, 2020 व दि.25 ऑक्टोबर, 2020 अनुक्रमे शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टीचे दिवस असल्याने) सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “ परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ ” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय , कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल . या कर्जावर दि. 25 ऑक्टोबर, २०२० पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.
महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे 2020 ची परतफेड दि.23 ऑक्टोबर 2020 रोजी.
सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप – विनियम २४ (२) व २४ (३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बॅकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल . रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी , अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक , बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप – कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास / त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे , त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील .

तथापि , बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या / इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी , नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी , 6.81 % महाराष्ट्र शासन रोखे , २०२० च्या धारकांनी , लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत . रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत :

” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली . ” भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास , ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत . याची विशेष नोंद घेतली पाहिजे .

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना , रक्कम स्वीकारायची असेल , त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोवितरित्या पाठवावेत . लोक ऋण कार्यालय हे , महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा – या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात / उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील अशी माहिती वित्त विभागाच्या 25 सप्टेंबर 2020 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech