महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये राखी टपालासाठी खास वितरण व्यवस्था.

0

 

 

“राखी” हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा भावनिक उत्सव आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्रातील डाक
घरांत बुक होतील अशी अपेक्षा आहे.

राखी टपाल बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व डाक घरांतून

करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत.

यावर्षी हा सण अधिक महत्वाचा आहे, कारण त्याच शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधांमुळे या सणासाठी भेट घेणे शक्य होणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ-बहिणी कंटेनमेंट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये रहात असतील. या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे आणि “स्पीडपोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल” अशा घोषवाक्याने आनंद देण्याची विभागाची इच्छा आहे.

राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020  (सोमवार) असल्यामुळे, महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट, रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे.

प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी पोचण्यासाठी सर्वांनी लोक स्पीड पोस्ट सेवेचा फायदा घ्यावा.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech