महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील 124 पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील

0

 

 

मुंबई :महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील 124 पदे तातडीने भरणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील 124 पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

दि.22 मार्च 2012 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लिपिक-टंकलेखक पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून गट- क मधील लिपिक-टंकलेखक यांच्या एकूण रिक्त पदांच्या 10 टक्के पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.दि. 23 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार 22 मार्च 2012 च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसार लिपिक टंकलेखकांची 11पदे (5 % च्या मर्यादेत )भरण्यात आली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दि. 4 ऑक्टोबर 2018 अन्वये मान्यता दिल्यानुसार वर्ग – 3 व वर्ग – 4 ची एकूण 15 पदे (10 % च्या मर्यादेत )भरण्यात आली आहेत.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या 11 ऑक्टोबर 2019 अन्वये सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. 10 जून 2019 च्या शासन निर्णयानुसार वर्ग-3 व वर्ग-4 ची एकूण 15 पदे भरण्यात आली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील 124 पदे तातडीने भरणार. दि. 31 डिसेंबर 2019 रोजी सरळ सेवेची असणारी रिक्त पदे विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाच्या 11 सप्टेंबर 2019 मधील शासन निर्णयानुसार येणारी 20 टक्के पदे विचारात घेऊन प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे. भरती सन 2019 या वर्षाकरिता असून शासन निर्णय दि. 15 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार 10% अनुकंपा धारकांची सन 2019 मधील भरती यापूर्वीच मंजूर झालेली असल्याने 15 पदे वगळून आता 124 अनुकंपा धारकांची संवर्गनिहाय पदभरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहितीही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech