ज्येष्ठ संगीतकार श्रीमती उषा खन्ना यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

0

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार श्रीमती उषा खन्ना यांना सन 2019-20  चा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी  हा पुरस्कार प्रदान सोहळा रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि 5 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गेल्या वर्षीचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ संगीतकार श्री.आनंदजी शाह आणि श्री अशोक पत्की यांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 या पुरस्कार सोहळयास वस्त्रोद्योग, मत्स्य विकास तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.अस्लम शेख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर,  खासदार श्री. राहुल शेवाळे आणि आमदार श्री. सदा सरवणकर हे मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

              श्रीमती उषा खन्ना यांचा जन्म 7 ऑक्टोबर, 1941 रोजी झाला.  भारतीय चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शिका म्हणून यशस्वी कारकीर्द घडविणाऱ्या तिसऱ्या महिला संगीत दिग्दर्शिका. बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन, आओ प्यार करे यासारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत खूप गाजले.  सन 1960-1980 या दशकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी दिली.

               या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, सर्व रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले आहे.

                                                                                  ….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech