ज्येष्ठ समाजसेविका विद्या बाळ यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा शोक संदेश

0

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व माझी मैत्रिण श्रीमती विद्या बाळ यांचे निधन अत्यंत दु:खद घटना आहे. गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना त्रास होत होता. नुकतीच त्यांची मी हॉस्पीटलमध्ये भेट घेतली होती. त्यांची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती व संवेदनशील मन, सिध्दहस्त लेखणी तसेच माणसांशी अत्यंत प्रेमाने संवाद करण्याची मानसिकता अशी त्यांच्या व्यक्तीमत्वाची अनेक वैशिष्ठ्ये होती. त्यांनी आणि मी जवळजवळ गेली 35 वर्षे बरोबर काम केले आहे. आम्ही अनेक ठिकाणी प्रवास केला अनेक परिषदांमध्ये गेलो अनेक संघटना उभ्या केल्या.

अनेक ठिकाणी अनेक प्रश्नांवर बरोबरीने आवाज उठवला त्यांचे कार्य होते ते एखाद्या ठिकाणी टॉर्च बेअरर म्हणता येईल असे पुढे मशाल घेऊन नेणारी व्यक्ती सर्व महिलांमध्ये व मध्यमवर्गीय महिलांमध्ये स्वत:ची ओळख करून देण्यासाठी त्यांनी एक वेगळा प्रवास स्वत: केला व त्यात अनेक महिलांना सहभागी करून घेतले. माझी वैयक्तिक हानी त्यांच्या निधनामुळे झालेली आहे तसेच सामाजिक संघटनामध्ये सुध्दा त्यांचे काम कायम अविस्मरणीय राहिल. त्यांना मन:पुर्वक श्रध्दाजंली व्यक्त करते. आणि त्यांच्या कार्यातून अनेक स्त्रीयांना कायम प्रेरणा मिळत राहिल अशा प्रकारे निश्चितपणाने संकल्प मनामध्ये ठेवते.

                                                                                               ….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech