‘जय महाराष्ट्र’मध्ये ‘नागरी सेवा परीक्षेची तयारी’ या विषयावर तृप्ती धोडमिसे-नवत्रे यांची मुलाखत

0

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘नागरी सेवा परीक्षेची तयारी’ या विषयावर यंदा नागरी सेवा परीक्षा 2018 मध्ये देशात 16 वा क्रमांक पटकावलेल्या तृप्ती धोडमिसे-नवत्रे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार, दि. 24 मे 2019 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्य लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी, नवोदितांनी अभ्यास करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी, पूर्व व मुख्य परीक्षेची तसेच मुलाखतीची तयारी, मराठी व इंग्रजी माध्यमातून उपलब्ध असलेले साहित्य, अभियंता, राज्य शासनात वर्ग एक अधिकारी ते सनदी अधिकारी पर्यंतचा यशस्वी प्रवास आदी विषयांची माहिती श्रीमती धोडमिसे -नवत्रे या ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून देणार आहेत.

IANS.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech