‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मुलाखत

0

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘दर्जेदार रस्ते, गतीमान महाराष्ट्र’ या विषयावर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. २२ आणि गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची पुढील दिशा, रस्ते व शासकीय इमारती वेळेत पूर्ण व्हाव्यात व कामे दर्जेदार व्हावीत यासाठीचे धोरण, राज्यातील रस्त्यांची सद्य:स्थिती व त्याच्या दुरुस्तीचे धोरण, रस्ते, पुल, इमारतीचे बांधकाम व देखभाल यांच्या कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठीच्या उपाययोजना, हायब्रिड योजना, रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचे धोरण, ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना आदी विषयांची माहिती श्री. चव्हाण यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech