जय महाराष्ट्र व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांची मुलाखत

0

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बॉयलर इंडिया 2020 परिषद’ या विषयावर बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होईल. तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बुधवार दि. 19 आणि गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सकाळी 7: 25 ते 7:40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

बाष्पकाच्या सुरक्षित वापरासाठी 150 वर्षांपूर्वी भारतात बाष्पकाच्या निरीक्षणास झालेली सुरुवात, बाष्पके प्रमाणपत्र देण्यापूर्वी बाष्पक संचालनालयामार्फत केली जाणारी कार्यवाही, तसेच प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना ठरविण्यात आलेले निकष, बॉयलर अर्थात बाष्पक परिषद 2020 विषयी माहिती, ही परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश, बॉयलर उत्पादन, बॉयलर उद्योग यांमधील रोजगाराच्या संधी, या परिषदेसाठी कशी नोंदणी करावी, महाराष्ट्रात बाष्पके संचालनालयाचे बळकटीकरण आणि बाष्पके कायद्याच्या प्रभावी अंलबजावणीसाठी सुरु असलेले प्रयत्न, संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या विषयांची माहिती श्री. अंतापूरकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

0000

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech