जळगाव जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यास मान्यता .

0

 मुंबई  : जळगाव जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यास मान्यता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाची बैठक. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या 147 व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

       या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सन 2016- 17 चा वार्षिक लेखा परीक्षण अहवाल मंजूर करण्यात आला.

म.जी. प्रा. : एकाकी पदांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील  पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत त्यांच्या ग्रेड वेतनामध्ये  सुधारणा करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

           राज्यातील सर्व नागरी पाणी पुरवठा व मलनिःसारण योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण

       कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याबाबत तसेच  जिल्हा परिषदेकडे प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन व रजा अंशदान बाबतची अट रद्द करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

         राज्यमंत्री संजय बनसोडे हे या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.       यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकरमुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती दिपाली देशपांडे – सावडेकर व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech