‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लेखक कवी प्रवीण दवणे यांची मुलाखत

0

 

मुंबई : ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लेखक कवी प्रवीण दवणे यांची मुलाखत.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘माय मराठी,साद मराठी’ या विषयावर साहित्यिक प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून गुरुवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मराठी भाषा संवर्धन. श्रवण,वाचन यांचा भाषावर्धनातील वाटा, बदलत्या काळात बदलत्या समाजमाध्यमांमुळे येणा-या काळातला मराठीचा प्रवास आणि बदलणारे स्वरूप,जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याकरिता मराठी भाषेतील शिक्षणाचे महत्व,गीतरचना करताना बोली भाषेची रंगत, मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवेत आदी विषयांची माहिती श्री. दवणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech