कांग्रेस-राष्ट्रवादी ने मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये

0
हाजी अरफात शेख यांचे प्रतिपादन
मुस्लिम समाज विकासाच्या बाजूने उभा राहील
अहमदनगर दि. २ (प्रतिनिधी ) :- हातावर घड्याळ बांधून फिरणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी ने मुस्लिम समाजाला आतापर्यंत खूप फसवलं, आता त्यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये, हा समाज आता जागृत झाला आहे तो नक्कीच त्यांना धडा शिकवणार, अशी तोफ अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि मुस्लिम समाजाचे नेते हाजी अरफात शेख यांनी डागली. अहमदनगर येथील महापालिका निवडणुकीत रविवारच्या प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी दोन सभा गाजवल्या.
खासदार दिलीप गांधी, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह त्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या.
येत्या ९ डिसेंम्बरला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असून ६८ जागांपैकी भाजपचे ६ उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. आजच्या भाजपच्या विजय संकल्प सभेला मुस्लिम समाजाचा जोरदार प्रतिसाद लाभला.
हलाल ची कमाई आणि हलालच खाणारा माझा कुरैशी समाज आहे, असे हाजी अरफात शेख म्हणाले.
 अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे . रविवार दिनांक ९ डिसेंबर रोजी अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होणार आहे त्या आधीचा हा शेवटचा रविवार होता.
भाजपाचे नेत्या पंकजा मुंडे आणि हाजी अरफात शेख यांच्या सह अनेक नेत्यांनी ठिकठिकाणी भाजपाच्या उमेदवारांसाठी “विजय संकल्प सभा” घेतल्या. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये झालेली हाजी अरफात शेख यांची प्रचार सभा.
मुस्लिम समाजाला स्वताची वोट बैंक समजणाऱयांचे डोळे पांढरे करणाऱ्या या सभेला संबोधित करताना हाजी अरफात शेख यांनी चांगलेच सुनावले.
Share.

About Author

Maintain by Designwell Infotech