सीएम चषक स्पर्धेत 24 लाख खेळाडूंची नोंदणी खेळांमुळे संघभावना वाढीस लागते -मुख्यमंत्री

0

 

नागपूर, दि.3 :आज शाळकरी वयातील मुले व तरूणाई मोबाईल व संगणकावरील खेळ खेळतात.  त्यांनी  शारीरीक खेळ  खेळण्यासाठी मैदानावर यावे. या उद्देशाने सीएम चषक या देशातील सर्वात मोठ्या क्रिडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यत राज्यात या स्पर्धेसाठी  24 लाख खेळाडूंची नोंदणी झाली आहे. याच गतीने  स्पर्धेसाठी नोंदणी होत गेल्यास लवकरच याची गिनीज बुकमध्ये   नोंद होईल असे  आश्वासक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात प्रतापनगर येथील क्रिडागंणात आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महापौर नंदाताई जिचकार, लघु उदयोग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी,इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, रमेश भंडारी,शिवानी दाणी, ,स्पर्धेच्या संयोजिका राणी व्दिवेदी , सारंग कदम उपस्थित  होते.

खेळ व सास्कृंतिक क्षेत्रात तरूणाई रमते . नवोदीत खेळाडूंना व्यासपीठ मिळावे म्हणुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

खेळामुळे  जीवनात खेळाडूवृत्ती निर्माण होते, संघ भावना वाढीस लागते. आयुष्यातील यश अपयशाकडे खेळाडू वृत्तीने पाहण्याचा दृष्टीकोन तयार होतो.  खेळाच्या माध्यमातुन खेळाडूंचा सर्वांगीण विकास होत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

तरुणाईंनी सुदृढ राहण्यासाठी  खेळले पाहीजे. मंदीरापेक्षा मैदानात जावे असे स्वामी विवेकानंद सांगुन गेले. स्वामी विवेकानंदाचा संदेश  या स्पर्धेच्या माध्यमातुन  तरूणाईं पर्यंत पोहोचविण्यात येईल असे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले. यावेळी फलंदाजी करून मुख्यमंत्र्यांनी स्पर्धेचे उदघाटन केले.

सीएम चषक या स्पर्धेसाठी  दक्षिण – पश्चिम  नागपूर क्षेत्रातून पाच हजार खेळाडूंनी नोंदणी केली ती  पंधरा हजारापर्यंत होण्याची अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल, तिरळे कुणबी समाजाला समाजभवन व सिंधी समाजाला मालकी हक्काचे  पट्टे दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचा विविध संस्थांनी सत्कार केला.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech