हज यात्रेसाठी 10 हजार 408 यात्रेकरुंची संगणकीय सोडतीद्वारे निवड मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सोडत संपन्न

0

मुंबई : सन 2020 च्या हज यात्रेसाठीची संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर झाली असून या सोडतीत राज्यातील 10 हजार 408 जणांची हज यात्रेसाठी निवड झाली आहे. केंद्रीय हज समितीच्या हॉलमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते शनीवार दि. 18 रोजी या सोडतीचा कार्यक्रम पार पडला.

हज 2020 करीता राज्यातून एकूण 28 हजार712 इतक्या हज यात्रेकरुंनी अर्ज दाखल केले आहेत. राज्याला एकूण 12 हजार 349 इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला आहे. यामध्ये 70 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1 हजार 910 ज्येष्ठ इच्छूक यात्रेकरुंनी अर्ज केले आहेत. महिला राखीव प्रवर्ग (मेहरम शिवाय जाणाऱ्या स्त्रिया) 31 आहेत व खुला प्रवर्ग 10 हजार 408 असा आहे. राखीव प्रवर्ग संख्या 1 हजार 941 जागा वगळता उर्वरीत एकूण 10 हजार 408 हज यात्रेकरुंकरिता आज संगणकीय सोडत (लॉटरी) काढण्यात आली. राज्यातून निवड झालेले हज यात्रेकरु मुंबई, नागपूर, औरंगाबाद व हैद्राबाद या गंतव्यस्थानावरुन (Embarkation point) या वर्षीच्या हज यात्रेस रवाना होणार आहेत.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खान, कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech