दुरुस्ती कामांचे GEOTAG व व्हिडीओ चित्रिकरण.

0

श्री.गडाख म्हणाले ,दुरुस्ती कामांचे GEOTAG व व्हिडीओ चित्रिकरण.कामाची गुणवत्ता उत्तर दर्जाची राहील याची जबाबदारी जलसंधारण अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक कामांची उलट तपासणी करण्यात येणार आहे. दुरुस्ती कामाचा दोष दायित्व कालावधी ५ वर्षोचा राहणार आहे. प्रत्येक कामांचे GEOTAG व व्हिडीओ चित्रिकरण बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री गडाख यांनी माहिती देतांना सांगितले की, राज्यातील विविध विभागातील ० ते १००हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या ८०२ प्रकल्प आणि १०० ते २५० हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेले ६० प्रकल्पांच्या दुरुस्ती अनेक वर्षांपासून प्रलंबित होते.त्यामुळे प्रकल्पातील पाणी वाया जात होते. शेतकऱ्यांना प्रकल्प आपल्या परिसरात असूनही त्याचा लाभ होत नव्हता. शेतकऱ्यांना त्या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात येणार आहे.

या दुरुस्तीमध्ये ० ते १०० हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या कामात अमरावती विभागातील २०२ कामांना ५७.२३ कोटी, औरंगाबाद २२७ कामांना ३४.४० कोटी,ठाणे २ कामांना १८ लाख,नागपूर ९३ कामांना १४.७८ कोटी,नाशिक १२० कामांना ३१.६२ कोटी,पुणे १५८ कामांना ६४ लाख मंजूरी देण्यात आली आहे. तर १०० ते २५० हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या ठाणे विभागातील २ कामांना ६.२२ कोटी,नाशिक ७ कामांना ४.५९ कोटी, पुणे २५ कामांना ११.२२ कोटी,अमरावती १८ कामांना ३.९७ कोटी,औरंगाबाद ४ कामांना १.११कोटी आणि नागपूर ४ कामांना १.७० कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech