‘दिलखुलास’ कार्यक्रमात वनमंत्री संजय राठोड यांची मुलाखत

0

 

 

मुंबई : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वनमंत्री संजय राठोड यांची मुलाखत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वनमंत्री संजय राठोड यांची ‘वनक्षेत्र वाढीबरोबर निसर्ग पर्यटनावर भर’ याविषयी सविस्तर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शुक्रवार दि. 18 आणि शनिवार दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवरही प्रसारित होणार आहे. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी घेतली आहे.

 

वनक्षेत्र वाढविण्याबाबतचे नियोजन, वनीकरणाविषयी आणि निसर्ग पर्यटनासंदर्भात सुरू असलेली कामे, राज्यात वाघाच्या संख्येत वाढ झाली असून राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात सुरू असलेली कामे, नगर वन उद्यान ही संकल्पना, शाळा रोपवाटिका योजना, महिला बचत गटासाठी वन विभागामार्फत सुरू असलेले काम, जैविक वारसा क्षेत्र घोषीत करण्याविषयी राज्यात सुरू असलेले काम आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. राठोड यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech