मुंबई :‘दिलखुलास’ कार्यक्रमात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मुलाखत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात ‘नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण’ या विषयावर ऊर्जा राज्यमंत्री श्री.प्राजक्त तनपुरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. २ डिसेंबर आणि गुरुवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲपवर याच वेळेत ही मुलाखत ऐकता येईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत नवीन ऊर्जा धोरणाची गरज, नवीन कृषीपंप वीज जोडणीच्या धोरणात दरवर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज जोडणी, वीजबिल वसुलीसाठी घेण्यात येणारे सहाय्य, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन, अपारंपरिक ऊर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना राबविणार आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. तनपुरे यांनी दिली आहे.