मुंबई:‘दिलखुलास’ कार्यक्रमात,भाषा संचालक विजया डोनीकर यांची मुलाखत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘भाषा संचालनालयाचे उपक्रम‘ या विषयावर मराठी भाषा विभागाच्या, भाषा संचालक विजया डोनीकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एअर या अॅपवर गुरुवार दि. २८ आणि शुक्रवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
१४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जातो. या पंधरवड्याचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात आली आहे. भाषा संचालनालयाचे कामकाज, मराठी विषयक शासकीय धोरणे, प्रशासकीय परिभाषा कोष व मार्गदर्शकचा वापर, सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अधिकाधिक होण्याकरिता अंमलात आणलेल्या उपाययोजना, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धा आणि तयार केलेली संकेतस्थळे या आदी विषयांची माहिती विजया डोनीकर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.