‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवयित्री निरजा यांची मुलाखत

0

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवयित्री निरजा यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार, दि. 16 जानेवारी आणि शुक्रवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कवयित्री निरजा यांची आजवरची साहित्यिक वाटचाल, त्यांनी लिहिलेली विविध पुस्तके, कथालेखन, मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठीचे प्रयत्न, आजच्या नवोदित पिढीचा साहित्यविषयक दृष्टिकोन, मराठी भाषेची आधुनिक तंत्रज्ञानाशी घालण्यात येणारी सांगड आदी विषयांची माहिती श्रीमती निरजा यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech