सीआयआय हॉस्पिटल टेक – 2020 चे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0

 

मुंबई : सीआयआय हॉस्पिटल टेक – 2020 चे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने आपण कोरोनासारख्या संकटावर सहज मात करू शकतो, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

कॉन्फेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्यावतीने (सीआयआय) आयोजित ‘सीआयआय हॉस्पिटल टेक-२०२०’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. देसाई बोलत होते. यावेळी ब्रिटीश उप उच्चायुक्त अँलन गेमेल, डॉ. रमाकांत देशपांडे, सुधीर मेहता, जॉय चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

सीआयआय हॉस्पिटल टेक – 2020 चे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
श्री. देसाई म्हणाले की, राज्यशासन कोविड संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड चाचण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली. आयसीयु बेडस् मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढविला आहे. येत्या काळात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांची चाचणी केली जाईल. प्रतिदिन सुमारे दीड लाख चाचण्या करण्याचा शासनाचा मानस आहे.

नुकतेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना शासनाने सुरू केली आहे. त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. नवीन तंत्रज्ञान नेहमीच उपयुक्त ठरते. त्याचा वापर करून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री. देसाई म्हणाले.

‘सीआयआय’च्यावतीने राबविण्यात येत असलेल्या टेली आयसीयु प्रकल्पास राज्यशासन सर्व सहकार्य करेल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

चार दिवस चालणाऱ्या या डिजिटल प्रदर्शनात साठहून अधिक देशातील कंपन्या सहभागी होणार आहेत. आरोग्यविषयक तिनशेहून अधिक उत्पादने या प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. या उपक्रमास नेदरलँडने ‘भागीदार देश’ म्हणून पाठिंबा दर्शविला आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech