चिपळूणात ‘वणवा मुक्त कोकण’ची स्थापना कार्यकारी मंडळ जाहीर

0

 

चिपळूण : चिपळूणात ‘वणवा मुक्त कोकण’ची स्थापना कार्यकारी मंडळ जाहीर. अध्यक्षपदी श्रीराम रेडिज, सचिव भाऊ काटदरे. कोकणची सांस्कृतिक राजधानी आणि असंख्य कृतीशील चळवळींचे माहेरघर असलेल्या चिपळूणात, सह्याद्री निसर्ग मित्रच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करणारे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य भाऊ काटदरे आणि ग्लोबल चिपळूण पर्यटनच्या माध्यमातून चिपळूणला ‘डेस्टीनेशन’ बनविण्यासाठी कार्यरत असलेले पर्यावरणस्नेही उद्योजक श्रीराम रेडिज यांच्या चिपळूणात ‘वणवा मुक्त कोकण’ची स्थापना कार्यकारी मंडळ जाहीरनेतृत्वाखाली नुकतीच शहरात ‘वणवा मुक्त कोकण’ कृती गटाची स्थापना झाली आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या सभेत श्री. रेडिज यांच्यावर अध्यक्ष आणि काटदरे यांच्यावर सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली असून कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. हा गट सुरुवातीला चिपळूणातून काम करणार असला तरी संपूर्ण कोकण वणवा मुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून कार्यरत राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
चिपळूणात ‘वणवा मुक्त कोकण’ची स्थापना कार्यकारी मंडळ जाहीर.
कार्यकारी मंडळात उपाध्यक्ष म्हणून प्रवीण कांबळी, निलेश बापट, सहसचिव अनिकेत बापट तर सदस्य म्हणून धीरज वाटेकर, दिनेश दळवी, विलास महाडिक, डॉ. गौरव बारटक्के हे कार्यरत असणार आहेत. ‘वणवा मुक्त कोकण’साठी सुरवातीला चिपळूण तालुक्यातील महत्त्वाच्या गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या आधारे कामाचा प्राथमिक कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. ‘वणवा मुक्त गाव ही सध्याची प्राथमिकता असेल.’ याकामात तालुक्यातील ग्रामपंचायती, वनविभाग, पोलिस, विविध सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. या सभेपूर्वी वणवा मुक्त कोकण गटातर्फे प्रवीण कांबळी आणि अनिकेत बापट यांना नेरळ कर्जत येथील सगुणा बागेने विकसित केलेले वणवा लागू न देण्याच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यांना सगुणा बागेत कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे, अनिल निवळकर, परशुराम आगीवले यांनी वणवा मुक्ती आणि प्रगत शेतीचे मार्गदर्शन केले. कांबळी आणि बापट यांनी सगुणा बागेतील तंत्रज्ञानाची माहिती सभेत दिली. गेली अनेक दशके कोकणात वणवे लावले जातात. यात मोठ्या झाडांसोबत विविध प्रकारच्या दुर्मीळ जैवविविधताची साखळी संपुष्टात येते. डोंगरांचे रुपांतर सुरुवातीला पांढऱ्या मातीत आणि नंतर वाळवंटात होण्याचा धोका वाढतो. हे सगळे वेळीच चिपळूणात ‘वणवा मुक्त कोकण’ची स्थापना कार्यकारी मंडळ जाहीरथांबविण्यासाठी ‘वणवा मुक्त कोकण’ प्रयत्न करणार आहे.

सभेला सागर रेडिज, सोहम घोरपडे, विश्वास पाटील, विनित वाघे, अजय गुढेकर, दिशा पतकर, मिलींद जोगळेकर, गजानन सुर्वे, नितीन नार्वेकर, अरविंद मोरे, शैलजा आखाडे, नरेंद्र चव्हाण, प्रल्हाद लाड, अनिकेत चोपडे, दिनेश दळवी, संजय वरेकर, बाळकृष्ण चव्हाण, सई रेडिज, राजेंद्र आंब्रे उपस्थित होते. वणवा मुक्त कोकणची ही पहिली सभा जागतिक पर्यटनदिनी बाजारपेठेतील लक्ष्मी बिल्डिंग हॉल येथे उपस्थितांनी सर्वांनी मास्क लावून आणि सोशल डिस्टन्स पाळून संपन्न झाली. अधिक माहितीसाठी आणि कृतीशील सहभागासाठी श्रीराम रेडिज मो. ७७६७००७११०, भाऊ काटदरे मो. ९४२३८३१७०० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

धीरज वाटेकर
dheeraj watekar, mob. +91 9860360948
https://dheerajwatekar.blogspot.com

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech