बुलडाण्यात राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार

0

मुंबई : बुलडाण्यात राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार.पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मागणीस परिवहन मंत्री सकारात्मक बुलडाणा येथिल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यास परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भातील मागणी केली आहे.
बुलडाण्यात राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार

मंत्रालयात परिवहन मंत्री ॲड परब यांच्या दालनात यासंदर्भात बैठक झाली. यावेळी या विषयावर चर्चा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ म्हणून बुलडाणा जिल्ह्याची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर तेथे पुतळा उभारण्याची मागणी डॉ. शिंगणे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याविषयीचा हा प्रस्ताव राज्य परिवहन मंडळाच्या बोर्ड मिटींग मध्ये घेण्यात यावा तसेच याबाबतचे निवेदन विधानमंडळात सादर करण्यासाठी तयार करण्यात यावे, असे निर्देश ॲड. परब यांनी संबधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech