बँक ऑफ महाराष्ट्रकडून कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रा.लि. (TAPL) ला वित्तसहाय्य

0

 

बँक ऑफ महाराष्ट्रकडून कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रा.लि. (TAPL) ला वित्तसहाय्य

 

पुणे : श्री ए. एस. राजीव, व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र यांनी बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित केलेल्या एका समारंभामध्ये कॅप्टन अमोल यादव यांना वित्तपुरवठा मंजुरी प्रदान केली. या समारंभास बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा व श्री नागेश्वर राव वाय., महाप्रबंधक (ऋण) श्री संजय रुद्र, महाप्रबंधक व पुणे शहर विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री व्ही.पी.श्रीवास्तव हे ही उपस्थित होते.

 

“TAPL” ला वित्तसहाय्य सुविधा देताना आम्हाला आनंद अतिशय आनंद होत आहे कारण भारतात विमान उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रात हा प्रकल्प पथदर्शी होईल आणि “मेक इन इंडिया” उपक्रमाला सन्मान प्राप्त करुन देईल असे मत व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री ए.एस.राजीव यांनी या समारंभात व्यक्त केले.

 

नव्या पिढीच्या उद्योजकांना बँक ऑफ महाराष्ट्र “मेक इन इंडिया” उपक्रमाअंतर्गत प्रोत्साहन देउन मदत करत आहे. या प्रकल्पाला वित्तसहाय्य करुन बँकेने एका आयात पर्यायी आणि भारतात विमान उत्पादनाकडे वाटचाल करणा-या प्रकल्पाला मदत केली आहे. थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रा.लि. (TAPL)  ही कंपनी कॅप्टन अमोल यादव यांनी प्रवर्तित केली आहे. त्याद्वारे भारतात विमान व हवाई वाहतूक क्षेत्रात उत्पादन, संशोधन, डिझाईन आणि तंत्रज्ञान सेवा पुरवल्या जातात.

 

श्री अमोल यादव हे व्यवसायानी उप मुख्य वैमानिक असून गेली 19 वर्षे स्वदेशी विमान बनविण्यावर काम करीत आहेत. एक असामान्य स्वप्न पाहिल्यावर सततच्या प्रयत्नांनी कॅप्टन अमोल यादव यांनी तांत्रिकदृष्टया सक्षम आणि संपुर्ण रितीने परिपक्व असे 6 व्यक्तींसाठीचे विमान बनविणे शक्य करुन दाखविले आहे. “मेड इन इंडिया” विमान बनवणारी भारतातील ही पहिली कंपनी आहे.

 

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech