अतुलकाका सराफ यांचेकडून निसर्ग व पर्यावरण मंडळास लॅपटॉप-प्रिंटर भेट

0

चिपळूण / अहमदनगर :अतुलकाका सराफ यांचेकडून निसर्ग व पर्यावरण मंडळास लॅपटॉप-प्रिंटर भेट. आपली उद्यमशीलता जपून समाज विकासाचा ध्याय घेतलेले, कुंथलगिरी येथे सुमारे ६९ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारणारे, नॅशनल ज्वेलरी अॅवार्डकडून ‘जेम ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेड बारामतीचे संचालक अतुलकुमार जीनदत्त शहा (सराफ) उर्फ अतुलकाका यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संवर्धनविषयक राज्यव्यापी कामाला गती प्राप्त व्हावी, तंत्रज्ञानाची जोड मिळावी या हेतूने लॅपटॉप, प्रिंटरसह एक वर्षांचे पेड झुम व्हिडीओ कन्फरन्स अॅप नुकतेच अध्यक्ष ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांना भेट दिले. जागतिक पर्यटनदिनी या तंत्रस्नेही भेटीचा ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे संपन्न झाला.
अतुलकाका सराफ यांचेकडून निसर्ग व पर्यावरण मंडळास लॅपटॉप-प्रिंटर भेट.
चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेडचे अहमदनगरचे प्रतिनिधी आनंदभाई कोठारी यांचे हस्ते मोरे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात ही भेट स्वीकारली. यावेळी मंडळाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसुळ, कार्याध्यक्ष पै. नाना डोंगरे, वैभव मोरे उपस्थित होते. मोरे यांच्या गेल्या ३/४ वर्षांतील सह्राद्री वाहिनी आणि इतर न्यूजवाहिन्यांवरील मुलाखती ऐकून अतुलकाका सराफ यांनी आबासाहेबांना फोन करून मंडळाचे काम जाणून घेतले होते. गेली काही वर्षे ते स्वतः आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण कुलकर्णी हे आबासाहेबांच्या संपर्कात आहेत. मंडळाच्या पर्यावरणीय कामावर समाधान व्यक्त करणाऱ्या सराफ यांनी या भेटीद्वारे मंडळाला तंत्रस्नेही होण्याची संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाच्या कामाचा आढावा घेतला. अतुलकाका यांच्या कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘कोरोना वैश्विक महामारीच्या काळात मंडळाला मिळालेलं हे दूरसंचार यंत्रणेच योगदान आपणा सर्व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या हाताना बळकटी देणारं ठरणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात तन, मन आणि धनाने सहभाग घेणाऱ्या, समाजाला आपण काय देऊ शकतो ? याचा विचार करणाऱ्या, सेंद्रिय शेतीत विशेष रुची असलेल्या अतुलकाकांनी, ‘वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे वय, सध्याची कोरोना स्थिती, मंडळाच्या पर्यावरण कामाची राज्यभर असलेली व्याप्ती, पर्यावरणप्रेमी सदस्यांचा मंडळातील सक्रीय सहभाग विचारात घेऊन अडचण येऊ नये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळ सतत प्रगतीपथावर कार्यरत व्हावे यासाठी दिलेल्या या योगदानाबद्दल वाटेकर यांनी अतुलकाकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी अतुलकाका यांना या सहकार्यासाठी धन्यवाद दिले. निसर्ग व पर्यावरण मंडळाचा प्रत्येक सदस्य हा पर्यावरण संवर्धन हे ध्येय समोर ठेवून कार्यरत आहे. मंडळाच्या माध्यमातून राज्यात बीजारोपण, वृक्ष लागवड मोहीमेसह रोपवाटिका नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना अतुलकाका शहा यांनी, झाडे वाढली तर आपल्याला अधिक ऑक्सिजन मिळणार असून हे काम व्हायला हवे असल्याचे म्हटले. मंडळाचे काम राज्यभर सुरु आहे ही चांगली बाब आहे. यासाठी आपण आपले कर्तव्य केल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला राज्यभरातून कार्याध्यक्ष विलास महाडिक, डॉ. गौतम सावंत, राजेंद्र सावंत, प्रियवंदा तांबोटकर, विलास शेडाळे, नाना पाटील, शिवा नंदकुले, बाळासाहेब चोपडे, प्रमोद मोरे, बाळासाहेब कणसे, माधव केंद्रे, बाबासाहेब महापुरे, अ‍ॅड. सौ. आंधळे, प्रणिता पाताडे, उमाजी बिसेन, सुहास गावितम रामदास खवसी, कचरु चांभारे, अनिल लोखंडे, संजय भापकर, डॉ. जगदीश पाटील, दत्तात्रय मंचरे, प्रमोद काकडे, सुनिल दिघे, नंदकुळे शिवप्पा, नयना पाटील, संजय ताडेकर, लीलाधर वानखेडे, राजेश पाटील, सुरेंद्र पाटील, प्रभाकर तावरे, विजय लुल्हे, रविंद्र खरादे, कुंभकर उपस्थित होते. यांनी सहभाग नोंदवला. कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन आणि आभार मारुती कदम यांनी मानले. वनश्री प्रतिज्ञा वाचनाने कॉन्फरन्सचा समारोप झाला.

धीरज वाटेकर
dheeraj watekar, mob. +91 9860360948
https://dheerajwatekar.blogspot.com

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech