अल्पसंख्याक तरुणांसाठी शिक्षण, रोजगार निर्मितीवर भर

0

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अधिक सक्षमीकरण करुन त्या माध्यमातून अल्पसंख्याक तरुणांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी आज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री. मलिक यांनी आज महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि रोजगारासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जविषयक विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे सहसचिव एस. सी. तडवी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिस शेख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मौलाना आझाद महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना बारावीनंतर विविध व्यावसायीक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. याशिवाय बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. या योजनांमध्ये सुसूत्रता आणून अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांना त्याचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने विविध सूचना केल्या.

श्री. मलिक यांनी महाराष्ट्र राज्य हज समितीच्या कामकाजाचाही आढावा घेतला. हज यात्रेकरुंना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात त्यांनी सूचना दिल्या.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech