मुंबई:अकोल्यातील वैभव हॉटेल प्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार- राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर.अकोला येथील वैभव हॉटेल मधून ग्राहकांनी खरेदी केलेली आलू भुजियाची पाकिटे उंदराने कुरतडल्या नंतरही त्याठिकाणी चिकटपट्टी चिकटवून पाकिटे विकल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती. यात त्रुटी आढळल्यानंतर या पेढीचा परवाना दोन दिवसांकरिता निलंबित करण्यात आला. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल तसेच जे अधिकारी हॉटेल चालकांना पाठीशी घालत असतील त्यांच्यावरही चौकशीअंती कारवाई केली जाईल अशी माहिती राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी दिली. या संदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.
अकोल्यातील वैभव हॉटेल प्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार
0
Share.