अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईन कोरोनाची परिस्थिती  पाहून पुढील वर्षासाठी निर्णय घेणार

0

            मुंबई :अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईन,कोरोनाची परिस्थिती  पाहून पुढील वर्षासाठी निर्णय घेणार- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड. राज्यात इयत्ता अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. यापुढील काळातही कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करावी किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याबाबत  विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

            शासनाने गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारावर ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली. कोरोनामुळे प्रवेश व शुल्क ऑनलाइन घेण्यात आले. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये इतर भागातील विद्यार्थीही प्रवेश घेत असतात व काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जात असल्याने काही जागा रिक्त राहतात. परंतु या जागा रिक्त राहू नये ही शासनाची भूमिका आहे अशी माहितीही शिक्षण मंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिली.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech