आष्टी व शिरूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यास तात्काळ मंजुरी देणार

0

 

मुंबई : आष्टी व शिरूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यास तात्काळ मंजुरी देणार – नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे.बीड जिल्ह्यातील आष्टी व शिरूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यास मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यास तातडीने मंजुरी दिली जाईल तसेच पाटोदा नगरपंचायतीचा विकास आराखड्याचा फेर प्रस्ताव विहित मुदतीत सादर करण्याचे आदेश सहाय्यक संचालक नगर रचना, बीड यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
पाटोदा नगर पंचायतीच्या विकास आराखड्याबाबत फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरूर कासार या नवीन स्थापित शहरांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळण्याबाबत सदस्य सुरेश धस यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पाटोदा नगरपंचायतीचा विकास आराखडा विहित मुदत संपल्यानंतर शासनाला सादर झालेला असल्यामुळे त्याबाबत संविधानिक कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

विकास आराखड्यातील आरक्षणाबाबत तक्रारी असल्यास चौकशी

नगरपालिकांच्या विकास आराखड्यातील आरक्षणाबाबत कुणाच्या तक्रारी आल्या तर त्याची गुणवत्तेनुसार चौकशी केली जाईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech