26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

0

 

मुंबई : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी वाहिली आदरांजली. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस शूरवीरांना आज मुंबई पोलीस आयुक्तालय प्रांगणातील शहीद स्मारक येथे मानवंदनेसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अपर्ण करुन आदरांजली वाहिली.

त्यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांनी देखील शहीद स्मारकास पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आमदार भाई जगताप, मुख्य सचिव संजय कुमार, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव (गृह) विनीत अग्रवाल, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलिस आयुक्त परमवीर सिंग तसेच सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech