25 टक्क्यांपर्यंत भाड्यामध्ये सवलत देण्यात यावी – राज्यमंत्री

0

 

25 टक्क्यांपर्यंत भाड्यामध्ये सवलत देण्यात यावी.   कोविड -19 पार्श्वभूमीवर राज्यात 24 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर मिशन बिगीन अगेन अंतर्गत 25 जूननंतर चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली. या काळात अनेक चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी चित्रनगरी येथील स्टुडिओ चित्रीकरणासाठी आरक्षित केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रीकरण होऊ शकले नसल्याने अनेक चित्रपट संघटनांनी आकारण्यात येणाऱ्या भाडयामध्ये सूट मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरुनच चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या निर्मात्यांना 25 टक्क्यांपर्यंत भाड्यामध्ये सवलत किंवा चित्रीकरणासाठी नव्याने तारखा देण्यात येतील.          चित्रनगरीसाठी तांत्रिक तज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांची नियुक्ती आणि पॅनेल तयार करणे, सलग चित्रीकरण करणाऱ्या निर्मात्यांना चित्रीकरण दरात सवलत देणे, चित्रनगरी येथे मुख्य सुरक्षा कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक करणे,चित्रनगरीमध्ये उपहारगृह सुरु करणे, वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी इंटर्न्सशिप सुरु करणे, चित्रनगरीच्या भाडे सवलती पध्दतीत सुधारणा करणे आणि चित्रनगरीचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अशा विविध मुद्यांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech