23 लाख 30 हजार लोकांनी  घेतला शिवभोजनाचा लाभ- छगन भुजबळ

0

 

  मुंबई : राज्यात दि. 1 जुलै ते दि .24 जुलै पर्यंत 873 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 23 लाख 30 हजार 319 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ  घेतला  असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

        राज्यात  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257,मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040,जून महिन्यात  30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 23 लाख 30 हजार 319 आणि असे एकूण  दि.  1 एप्रिल  ते  दि . 24 जुलै या कालावधीत 1 कोटी  13 लाख 9 हजार 848 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech