उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल मा. राम नाईक यांनी बोरीवली येथे मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांनी नागपूर येथे सह परिवार मतदान केले. केंद्रीय राज्यमंत्री मा. संजय धोत्रे यांनी सपत्नीक अकोला येथे मतदान केले.

उच्च शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे यांनी पत्नी वर्षा तावडे यांच्या सोबत विलेपार्ले येथे मतदान केले. शिक्षणमंत्री मा. आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम येथे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सपत्नीक डोंबिवली येथे तर महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी सहपरिवार गोरेगाव येथे मतदान केले.

खा. गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली येथे मतदान केले. खा. डॉ. हिना गावित यांनी नंदूरबार येथे, खा. हेमा मालिनी यांनी जमनाबाई स्कूल, विलेपार्ल येथे मतदान केले. माजी खा. डॉ. किरीट सोमय्या यांनी सहकुटुंब मुलुंड येथे, माजी खा. दिलीप गांधी यांनी अहमदनगर येथे मतदान केले.

आ. अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व येथे, आ. गोवर्धन शर्मा अकोला पश्चिम येथे, आ.निरंजन डावखरे यांनी सपत्निक ठाणे येथे मतदान केले. आ.पास्कल धनारे यांनी डहाणू येथे, आ.संजय केळकर यांनी सहपरिवार ठाणे येथे मतदान केले. अकोला पूर्व येथे आ. रणधीर सावरकर यांनी मतदान केले. आ.सुधीरदादा गाडगीळ यांनी सहपरिवार सांगली येथे, आ.मंदा म्हात्रे यांनी सहपरिवार बेलापूर येथे मतदान केले. आ.प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे मतदान केले. आ.आर.एन.सिंग यांनी पवई येथे मतदान केले.

साकोलीचे उमेदवार डॉ.परिणय फुके साकोली येथे तर उमेदवार गणेश नाईक यांनी बेलापूर येथे मतदान केले.

प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन.सी. यांनी मलबार हील येथे मतदान केले. प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी जामसंडे, देवगड येथे, माध्यम विभाग प्रमुख व सह मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी वाकोला येथे मतदान केले. प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी सपत्नीक अमरावती येथे मतदानाचा हक्क बजावला. प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी सहपरिवार मतदान केले, प्रदेश मीडिया सहसंपर्क प्रमुख ओमप्रकाश चौहान यांनी मुलुंड येथे मतदानाचा हक्क बजावला.

www.forevernews.in

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech