मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरण

0

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारांचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरण

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे कृ.पां.सामक पुरस्काचे मानकरी

मुंबई: प्रतीष्ठेच्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्काराचे वितरण २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी २.३० रोजी सह्याद्री अतिथीगृहात हा सोहळा रंगणार आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे संस्थापक सदस्य व दिवंगत अध्यक्ष कृ. पां. सामक यांच्या नावाने दिला जाणारा पहिला तर आजवरचा हा तिसरा पुरस्कार आहे. यावर्षी जेष्ठ पत्रकार श्री. दिनू रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी विनायक बेटावदकर आणि विजय वैद्य या जेष्ठ पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील धडाडीच्या व नावाजलेल्या पत्रकारांमध्ये दिनू रणदिवे यांचे नाव घेतले जाते. रणदिवे यांचा जन्म डहाणुतील आदिवासी बहुल भागात सन १९२५ साली झाला. त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरूवात केली. दलित, उपेक्षित, शोषित, कामगार यांचे प्रश्न मांडतानाच त्यांनी राजकीय पत्रकारितेतही आपला ठसा उमटवित मोलाचे योगदान दिले आहे. देशाचा स्वतंत्र लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी सहभाग घेतला आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ने वृत्तपत्र माध्यमातून विश्वास वाघमोडे (दैनिक इंडियन एक्सप्रेस ) यांना व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महेश तिवारी (न्यूज 18 लोकमत )तसेच मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्याना देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने प्राजक्ता पोळ (न्युज 18 लोकमत ) यांना सन्मानित करण्यात येणार आहे .

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे दै. लोकमतचे समुह संपादक श्री. दिनकर रायकर तसेच एबीपी माझाचे कार्यकारी संपादक श्री. राजीव खांडेकर हे उपस्थित राहणार आहेत.

IANS.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech