कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत महावितरणच्या पुरूष व महिला कबड्डी संघाला कांस्यपदक.

0

मुंबई:  महावितरणच्या पुरूष व महिला कबड्डी संघाने कामगार क्रिडा भवन एल्फिन्स्टन मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित व्यावसायिक गटाच्या स्पधेत कांस्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेत पुरूष्‍ गटात एकूण ४५ संघ तर महिला गटात ५५ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुरूष गटात सर्वोत्कृष्ट पकडीचे पारितोषिक महावितरणच्या श्री. अमित जाधव यांना प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय व्यावयिक स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल दोन्हीही चमूचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

महावितरणच्या पुरूष कबड्डी संघात सर्वश्री धिरज रोकडे, अजय शिंदे, निलेश ठाकूर, सुनिल सावंत, अमित जाधव, प्रमोद ढेरे, निवास गावडे, परिक्षित शिंदे, राहूल सणस, सुहास पुजारी आणि अभिजित पाडावे यांचा सहभाग होता तर महिला कबड्डी संघात हर्षला मोरे, सायली कचरे, श्रध्दा देसाई, अश्विनी शेवाळे, पुजा पाटील, शर्वरी शेलार, स्पृहाली बागवे, प्रियंका उगले, माया येलवंडे आणि सोनाली मोरे या खेळाडूंचा सहभाग होता.

स्पर्धेतील दोन्हीही विजेत्या संघाचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक (मा.सं.) श्री. चंद्रशेखर येरमे यांनी कौतुक केले आहे. महावितरणच्या पुरूष व महिला अशा दोनही संघाचे प्रशिक्षक व संघव्यवस्थापक म्हणून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री. संतोष विश्वेकर यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

फोटो ओळ :-स्पर्धेतील दोन्ही विजेत्या संघासोबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक (मा.सं.) श्री. चंद्रशेखर येरमे.

IANS.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech