एकत्रितपणे आम्ही कोरोना विषाणूंविरूद्ध लढू शकतो! कोरोना व्हायरस (COVID-19) चा प्रसार थांबवा !! स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करा !!!

0

दिनांक 22 मार्च 2020 रोजीचा मेगा ब्लॉक

मध्य रेल्‍वे च्‍या उपनगरीय खंडावर पर अत्‍यावश्‍यक अनुरक्षण कार्य करण्‍यासाठी दिनांक
22.03.2020 रोजी खालिल प्रमाणे मेगा ब्लॉक परिचालित करण्‍यात येईल.

विद्याविहार-ठाणे डाउन जलद मार्गावर सकाळी 10.30 पासून ते दूपारी 3.30 वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ये‍थून सकाळी 09.49 पासून दुपारी 2.48 वाजेपर्यंत डाउन जलद/अर्ध जलद मार्गावर सुटणा-या सर्व उपनगरीय सेवा माटुंगा स्‍थानक येथून डाउन धीम्‍या मार्गावर वळविण्‍यात येतील तसेच शीव आणि मुंब्रा स्‍थानकादरम्‍यान सर्व स्‍थानकावर थांबतील आणि या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळे पेक्षा 20 मिनि‍टे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील. मुंब्रा स्‍थानकांनंतर ह्या गाड्या दिवा स्‍थानकापासून डाऊन जलद मार्गावर चालविण्‍यात येतील आणि आपल्‍या निर्धारित स्‍थानकांवर थांबतिल.

ठाणे येथून सकाळी 10.46 पासून दूपारी 2.58 वाजेपर्यत प्रस्‍थान करणा-या अप मार्गावरील जलद गाड्या आपल्‍या निर्धारित थांब्‍यां व्‍यतिरिक्‍त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, आणि कुर्ला स्‍थानकांवर थांबतील. या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळे पेक्षा 15 मिनटे
उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.

छत्रपती‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.00 पासून सायंकाळी 05.00 वाजेपर्यत आगमन/प्रस्‍थान करणा-या डाऊन तसेच अप मार्गावरील धीम्‍या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनटे उशीरा पोहचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –चुनाभट्टी / बांद्रा डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40
वाजल्‍यापासून दुपारी 4.40 वाजेपर्यत आणि
चुनाभट्टी / बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10
वाजल्‍यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यत

छत्रपती‍ शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दूपारी 4.47 वाजेपर्यत वाशी / बेलापुर / पनवेल येथे जाणा-या तसेच छत्रपती‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यत बांद्रा/गोरेगाव च्‍या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापुर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दूपारी 3.20 वाजेपर्यत छत्रपती‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणा-या तसेच बांद्रा/गोरगाव येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 वाजेपर्यत छत्रपती‍ शिवाजी महाराज टर्मिनस च्‍या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.

ब्‍लॉक काळात पनवेल-कुर्ला (प्‍लॅटफार्म क्रं. 8) खंडावर विशेष लोकल चालविण्‍यात येतील.

ब्‍लॉक काळात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्‍वे आणि मुख्‍य मार्गावर प्रवास करण्‍याची मुभा राहील. ब्लॉक मुळे अन्‍य दिवसा पेक्षा उपनगरीय गाड्यां मध्‍ये अधिक गर्दी होऊ शकते. प्रवाशांना विनंती आहे की त्‍यांनी लोकल डब्‍यांच्‍या फुट-बोर्ड अथवा टपावर बसून प्रवास करू नये. अशा प्रकारचे अनुरक्षण ब्‍लॉक आधारभूत संरचना राखण्‍यासाठी व सुरक्षितते साठी अंत्‍यत आवश्‍यक आहेत. ब्‍लॉक काळात रेल्‍वे प्रशासनाला प्रवाशांनी कृपया सहयोग
करावा.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech