NCP to contest Gujarat polls sol…

  New Delhi: The Nationa…

Can Haryana's women achievers he…

  Chandigarh: Success as…

HC seeks Centre, West Bengal res…

  New Delhi: The Delhi H…

New Congress President to be ele…

  New Delhi: The Congres…

BJP announces third list of cand…

  Gandhinagar: The Bhara…

Centre should waive agricultural…

  New Delhi: Swaraj Indi…

CWC starts meet for Rahul's elev…

  New Delhi: The Congres…

Gujarat polls: Gohil, Modhwadia …

  Gandinagar: Senior Con…

Misty Monday morning in Delhi

  New Delhi: It was a mi…

BJP, government cheer Moody's ra…

  New Delhi: The ruling …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

राज्याच्या विकासात व्यापारी वर्गाचे मोठे योगदान

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

 

मुंबई, दि. 30 : राज्य आणि देशाच्या विकासात व्यापारी-उद्योजकांचे मोठे योगदान असून वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्याउद्योग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्रास होणार नाहीयाची काळजी शासन घेईल. तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन तसेच वित्तमंत्री म्हणून आपण स्वत: खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी निसंदिग्ध ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर काल सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी उद्योग-व्यापारी जगतातील प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आमदार राज पुरोहितमाजी आमदार अतुल शहाविक्रीकर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह या क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्योजक-व्यापार क्षेत्रातून भरल्या जाणाऱ्या करामधून राज्य आणि देशाला महसूल मिळत असतोज्या महसूलाचा उपयोग समजातील तळागाळातील व्यक्तीच्या कल्याणासाठीत्याच्या विकासासाठी होतो. त्यामुळे राज्याला महसूल मिळवून देणारे क्षेत्र जीएसटीच्या अंमलबजावणीनंतरही सुरळितपणे आपले व्यवहार करू शकतील अशी ही कर प्रणाली आहे. सहजता,सुलभता आणि सरलता ही या करप्रणालीची वैशिष्ट्ये असल्याचे सांगून अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की नवीन करप्रणाली असल्याने या प्रणालीबाबत अनेकांच्या मनात संदिग्धता आहे. काही गोष्टी मुद्दाम पसरवून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही संदिग्धता दूर करण्यासाठी विक्रीकर विभागाचे अधिकारी सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी सर्वक्षेत्रातील व्यक्तींशी संवादाची प्रक्रिया अधिक गतिमान केली आहे.  ही करप्रणाली अधिक सुटसुटीत असल्याचे सांगतांना या करप्रणालीमध्ये १७केंद्र आणि राज्य शासनाचे कर विलीन झाल्याचीकर दहशत संपुष्टात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*