Rahul Gandhi's hands full of cha…

  New Delhi: Anticipated…

Land most sought asset of Salem …

  Chennai: Tamil Nadu Ch…

Tripura CM urges Bangladesh to o…

  Chottakhola (Tripura):…

Policeman trains gun at Kamal Na…

  Chhindwara (Madhya Pra…

SC imposes Rs 1 lakh cost on NGO…

  New Delhi: The Supreme…

Modi to visit Ockhi-hit fishing …

  Thiruvananthapuram: Af…

Rahul's impending takeover spark…

  New Delhi: Scores of R…

President offers prayers at Sang…

  Lucknow: On the second…

Recognise Jerusalem as Palestine…

  Hyderabad: MIM chief A…

Three years jail for Jharkhand e…

  New Delhi: A court her…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

विविध संस्था, सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान अत्यंत उपयुक्त  – बबनराव लोणीकर

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

आष्टीसह 16 गावामध्ये राष्ट्रीय रुरबनच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणार

 

जालना : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध उपायोजना राबवित आहे. जिल्ह्यातील विविध संस्था व सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सोसायट्यांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत असुन त्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेले अटल महापणन विकास अभियान अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना व आत्मा, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अटल महापणन विकास अभियान कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.लोणीकर बोलत होते.

व्यासपीठावर माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था औरंगाबादचे राजेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक एन.व्ही.आघाव, नाबार्डचे श्री.भागवतकर, आत्माचे उपसंचालक डी.एम. दिवटे, ए.के.हदगावकर, कृषि पणन तज्ज्ञ ए.एस.भोसले आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यातील सहकारी संस्था तसेच सोसायट्यांचे बळकटीकरण होऊन त्या सक्षम झाल्या पाहिजेत. या संस्था, सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेऊन संस्था, सोसायट्यांचे सदस्य तसेच शेतकऱ्यांना विविध तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन करण्यात येऊन त्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचे काम करण्यात येत आहे. या कार्यशाळांमध्ये शेतकऱ्यांसह सोसायट्यांच्या सदस्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवून ज्ञान प्राप्त करुन घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात भाजीपाला, फळे, तसेच धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. परंतु उत्पादित केलेला माल कशा पद्धतीने बाजारामध्ये विक्री करावा याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही. संस्था, सोसायट्यांनी शेतकऱ्यांना केवळ कर्जाचे वाटप करणे व कर्जाची वसुली करणे यावर न थांबता शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करुन हा माल बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्रित करत शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग उभारणीसाठी पुढे येण्याची गरज असून या बाबींची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोसायट्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांच्या विकासासाठी राष्ट्रीय रुरबन येाजनेतून उपलब्ध 185 कोटी रुपयांच्या माध्यमातून गावांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतीपिकातून विविध उत्पादने तयार करुन त्यावर प्रक्रिया करणारे छोटेछोटे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टोमॅटो, केळी, बटाटे, सोयाबीन, मोसंबी या पिकांचे या भागात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या पिकापासून तयार केलेल्या मालाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असून गावातील शेतकऱ्यांचे बचत गट तसेच महिलांच्या बचतगटांना एकत्रित करुन परतूर तालुक्यात 100 प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय रुरबन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशात या माध्यमातून 100 तर राज्यात सहा क्लस्टर करण्यात येत असून यामध्ये आष्टीसह 16 गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत व मुबलक पाणी पुरवठयासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विकेंद्रीत पाणीसाठे निर्मितीवर भर देण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अत्यंत प्रभापीपणे राबविण्यात आले आहे. जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण तसेच 700 बंधाऱ्यांच्या निर्मितीबरोबर जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी, वीज व मालाला हमी भाव देण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात वीजेचे जाळे निर्माण करुन सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला योग्य दाबाने वीजेचा पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असुन जिल्ह्यात 33 के.व्ही. चे 49 उपकेंद्र मंजूर करण्यात आले असुन 19 उपकेंद्रांचे काम सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी 220 के.व्ही. चे 2 उपकेंद्र मंजुर असुन आवश्यकतेनुसार रोहित्रांच्या उभारणीवरही भर देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात जालना जिल्हा वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असतांनासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील सर्व पात्र व गरजू शेतकऱ्यांना होणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीची यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांना लवकरच प्राप्त होणार असुन शासन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून येणाऱ्या काळातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी श्री.जोंधळे म्हणाले की, ज्या भागात सहकार रुजला त्या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मराठवाडा व विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ मोठ्या प्रमाणात रुजल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकाराची चळवळ रुजण्याची गरज असल्याचे सांगून मराठवाड्यातील संस्था, सोसायट्या केवळ थकबाकीमुळे डबघाईला आल्या आहेत. त्यामुळे या संस्था, सोसायट्यांनी वितरित केलेल्या कर्जाची परतफेड होणे आवश्यक असुन शेतकऱ्यांनी हमीभावासाठी उत्पादकतेवर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*