INTACH report points to hurdles …

  New Delhi: The Indian …

SC bench headed by CJI to hear L…

  New Delhi: The Supreme…

Aadhaar seeding to eliminate mul…

  Kolkata: The Employees…

Tension grips J&K's border r…

  Jammu: Tension gripped…

Include millets in daily diet to…

  Bengaluru: With an vie…

Unfortunate that past government…

  New Delhi: It is the m…

EVMs to have candidates' picture…

  Jaipur:The Electronic …

SC upholds acquittal of 'Pipli L…

  New Delhi: The Supreme…

Karti Chidambaram questioned for…

  New Delhi: Karti Chida…

Decentralise powers in governmen…

  New Delhi: Delhi Chief…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

विनीत अग्रवाल यांच्या ‘कलयुग की पूर्व संध्या’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 13 : भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी तसेच सक्तवसुली संचालनालयाच्या पश्चिम विभागाचे विशेष महासंचालक विनीत अग्रवाल यांच्या ‘कलयुग की पूर्व संध्या’ (On the Eve of Kalyug) या द्विभाषिक पुस्तकाचे मंगळवारी (दिनांक १२) राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राज भवन येथे प्रकाशन झाले.

महाभारतातील युद्धाच्या अंतिम दिवशी घडलेल्या विविध घटनांचे वर्णन ‘कलयुग की पूर्व संध्या’ या पुस्तकात काव्यरुपाने करण्यात आले असून हे पुस्तक पोयेसिस सोसायटी फॉर पोएट्री यांनी प्रकाशित केले आहे.

‘महाभारत’ या महाकाव्यातून जीवन कसे जगावे हे जसे दिसते तसेच जीवन कसे जगू नये या गोष्टीचे देखील मार्गदर्शन होते. भगवत-गीता तसेच युधिष्ठीराने यक्षप्रश्नाला दिलेल्या उत्तरातून शाश्वत मानवी मूल्यांचे दर्शन घडते. विनीत अग्रवाल यांनी महाभारतातील विविध प्रसंग एका नव्या दृष्टीकोनातून लिहिले आहे. त्यांचे हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील काव्य भाषा सौंदर्यामुळे अतिशय प्रभावी झाले आहे असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले.

जावेद अख्तर : महाभारत केवळ अठरा दिवस चाललेल्या युद्धाची गाथा नाही. महाभारत मानवी संबंधांच्या प्रत्येक पैलूंचा, भावनांचा, विचारांचा तसेच जीवन मूल्यांच्या विविध रंगांचा महासागर असून आजही त्या सागरातून विचारांचे नवनवे मोती गवसतात. विनीत अग्रवाल यांनी या सागरातून काव्य रूपाने नवे मोती शोधले आहेत. त्यांनी ज्या दृष्टीकोनातून महाभारताची युद्धभूमी पाहिली त्या दृष्टीकोनातून आजवर कुणीही पहिली नाही असे मत प्रसिद्ध पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी यावेळी व्यक्त केले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक फणसाळकर, अभिनेते स्वप्नील जोशी, प्रधान सचिव वंदना कृष्णा तसेच विनीत अग्रवाल यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*