India best placed to leverage te…

  Hyderabad: Prime Minis…

Hardik may campaign for MP polls

  Bhopal: Gujarat's Pati…

Journalist who wrote about Parri…

  Panaji: A journalist w…

NCP candidate among 4 killed in …

  Shillong: Four people,…

Clear sky in J&K cause sub-z…

  Jammu/Srinagar: A clea…

Partly cloudy sky on Monday

  New Delhi:It was a par…

Canadian PM visits Mathura wildl…

  Lucknow: Canadian Prim…

'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

विमानतळाचा फ्री फ्लाईट झोन पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंधीत

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई, दि. 1 : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स,बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमानांच्या लँडींग आणि फ्लाईटमध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिनांक 27 ऑगस्ट 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) यांनी जारी केले आहेत. विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग), विमानाच्या उ्डडाणात (फ्लाईट), उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमानाच्या लँडींग, फ्लाईट, उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*