Respect cultures of all regions:…

  Hyderabad: Popular act…

CPI-M mulls impeachment motion a…

  New Delhi: The CPI-M o…

Congress slams Kerala Governor, …

  Thiruvananthapuram: Th…

Shiv Sena to go it alone in 2019

  Mumbai: In a major dec…

No ban on 'Padmaavat', SC clears…

  New Delhi: The Supreme…

Disqualified AAP MLAs move Delhi…

  New Delhi: A number of…

Anandiben Patel takes oath as ne…

  Bhopal: Former Gujarat…

Cloudy Tuesday, rains likely in …

  New Delhi: It was a cl…

Tauqeer Qureshi will be brought …

  Gandhinagar: Indian Mu…

Akhilesh hints at contesting Lok…

  Lucknow: Former Uttar …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

विधानपरिषद कामकाज

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

वंदे मातरमने विधानपरिषदेच्याकामकाजास प्रारंभ

नागपूर, दि. 11 – विधानपरिषदेतविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची  सुरुवात ‘वंदे मातरम’ने  झाली. याप्रसंगी  सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सभागृह नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत  पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, संसदीय कार्यमंत्री गिरीष  बापट, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख,शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती

नागपूर, दि. 11 – विधिमंडळाच्या  हिवाळी अधिवेशनासाठीसभापती रामराजे  नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे  तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री डॅा. अपूर्व हिरे, रामहरी रुपनवर, श्रीमती नीलम गो-हे, श्रीमती  विद्या चव्हाण यांची  नियुक्ती जाहीर केली.

दिवंगत माजी सदस्य ॲड. शरद सोनू वाणी यांना विधानपरिषदेत आदरांजली

नागपूर, दि. 11 – दिवंगत माजी विधान परिषद सदस्य ॲड. शरद सोनू वाणी यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारेआदरांजली वाहण्यात आली.

विधानपरिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत  पाटील यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्तावावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील,  सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली.

नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांचा शपथविधी

नागपूर, दि. 11 -नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य प्रसाद दिनेश लाड यांना सभापती रामराजे नाईक यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी सभागृह नेते चंद्रकात पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*