Madhya Pradesh legislators queue…

Bhopal: Legislators queue…

Non-BJP states boost centre's ag…

  New Delhi: It's a majo…

Voting for 14th President of Ind…

  New Delhi:  Voting to …

Next 'Mann Ki Baat' to air on Ju…

  New Delhi: Prime Minis…

1,141 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

Morphine mixture recovered from …

  New Delhi: Narcotics C…

Karnataka CM congratulates Presi…

  Bengaluru: Karnataka C…

Rainy Thursday morning in Delhi

  New Delhi: It was a ra…

Gaming PCs, convertibles to driv…

  New Delhi: The note ba…

1,877 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

हॉटेल व उपहारगृह व्यावसायिकांनी किंमती ठरवितांना काळजी घेण्याचे वस्तू आणि सेवा कर विभागाचे आवाहन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. ११ : पूर्वीच्या करप्रणालीमध्ये व नवीन वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये आपसमेळ योजनेत तसेच  अनुसूचितील दराने कर भरणा करणाऱ्या व्यावसायिकांवरील कर भार वाढत नसल्याने हॉटेल तसेच उपहारगृह व्यावसायिकांनी त्यांच्या हॉटेलमधील  पदार्थांचे दर वाढवण्याचे कोणतेच सबळ कारण राहात नाही, असे प्रतिपादन वस्तू आणि सेवा कर विभागामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकामध्ये करण्यात आले आहे.

वस्तू आणि सेवा कर विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या या प्रसिद्धपत्रकामध्ये खालील मुद्दे सविस्तररित्या स्पष्ट करण्यात आले आहेत.

वस्तू आणि सेवा कर प्रणालीची राष्ट्रीयस्तरावर १ जुलै २०१७ पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या काळात हॉटेल व उपहारगृह व्यावसायिकांबाबत नागरिकांकडून बऱ्याच तक्रारी प्राप्त होत आहेत.

या तक्रारीमध्ये हॉटेल व उपहारगृह व्यावसायिक जे बील देत आहेत त्यामध्ये  त्यांच्याकडून राज्य वस्तू व सेवा कर आणि केंद्रीय वस्तू आणि सेवा कराची वेगवेगळी आकारणी,  पूर्वीच्या मुल्यवर्धित कर प्रणालीअंतर्गत आपसमेळ करासहित असलेल्या दरामध्ये त्यावेळच्या  कराची कोणतीही कपात न करता त्यावेळेच्या करासहित असलेल्या रकमेवर/ मेन्युमधील दरांवर नवीन वस्तू व सेवा कर आकरणी करत आहेत अशा आशयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

या तक्रारीवरून असे निदर्शनास येत आहे की हॉटेल व्यावसायिक हे ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करत आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने बीजके (बिल) बनवत आहेत. याबाबत पूर्वीचा मूल्यवर्धित कर कायदा व सध्याची वस्तू आणि सेवा कर प्रणाली यातील हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत असलेल्या तरतुदी विचारात घेणे आवश्यक आहे.

पूर्वीच्या मूल्यवर्धित कर प्रणालीमध्ये हॉटेल/ उपहारगृहातील विक्रीवर आपसमेळ योजनेअंतर्गत एकूण उलाढालीच्या ५ टक्के किंवा ८ टक्के दराने (एकूण वार्षिक उलाढालीनुसार) कर भरणे आवश्यक होते. हा कर ग्राहकांकडून जमा करता येत नव्हता.

            सध्याच्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये लगतची मागील वर्षाची उलाढाल७५ लाखापर्यंत असलेल्या व्यापाऱ्यांना २.५ टक्के राज्य वस्तू आणि सेवा कर आणि २.५ टक्के केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणजेच एकूण ५ टक्के दराने कर भरणे आवश्यक आहे. त्यामुळे आपसमेळ योजनेत कर भरणाऱ्या वापाऱ्यांच्या बाबतीत दरवाढ होण्यासाठी कोणतेही ठोससबळ कारण नाहीत्यामुळे त्यांनी अशाप्रकारे दरवाढ करणे योग्य नाही.

याबरोबरच आपसमेळ योजनेत नसलेल्या व्यापाऱ्यांना सध्याच्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये उपहारगृहाचे/ हॉटेल व्यावसायिकांचे विविध प्रकार विचारात घेतले तरीही सर्व साधारणपणे कराचा दर हा १२ ते १८ टक्के असा आहे.  पूर्वीच्या मुल्यवर्धित कर कायद्यांतर्गत आपसमेळ योजनेत सहभागी नसलेले हॉटेल व्यावसायिक हे १३.५ टक्के दराने कर भरणा करून कर वजावट घेत होते. त्याचबरोबर वातानुकूलित उपहारगृहांना पूर्वीच्या कर पद्धतीमध्ये  सेवा कराचा बोजाही सहन करावा लागत होता. याचा एकत्रित विचार करता नवीन वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये हॉटेल व्यावसायिकांवरील कराचा भार जवळपास सारखाच राहात आहे अथवा कमी होत आहे.

तसेच वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये आपसमेळ योजनेचा लाभ न मिळणाऱ्या हॉटेल/ उपहारगृह व्यावसायिकांनी देखील याबाबी विचारात घेऊन वस्तू आणि सेवा कर बीजकांमध्ये (बिल किंवा देयक)  खाद्य पदार्थ आणि त्याची सेवा यांची निव्वळ रक्कम विचारात घेऊन कर आकारणी करणेखरेदीवर भरलेल्या कर वजावटीचा फायदा ग्राहकांना पोहोचवणे आवश्यक आहे.

नवीन वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये आपसमेळ योजनेअंतर्गत कर भरणा करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्या सर्व व्यवसाच्याठिकाणी ठळक अक्षरात “ Composition Taxable person” असे लिहिणे आवश्यक आहे

याशिवाय बिजकांमध्ये आकरलेल्या कराचे दर  सारखे असणे आवश्यक आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये आपसमेळ योजनेचा लाभ घेऊन कर भरणा करणाऱ्या आणि पूर्वी च्या व सध्याच्या कर पद्धतीमध्ये आपसमेळ योजनेत नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थाच्या किंमती ठरवताना या सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. पूर्वी आपसमेळ योजनेत असलेल्या व नवीन कर पद्धतीमध्ये आपसमेळ योजनेत नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी त्यांना नवीन कर पद्धतीत मिळणाऱ्या कर वजावटीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*