'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

शेतकऱ्यांना सहभागी करून घेत नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत चंद्रभागेकाठी वृक्ष लागवड

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. 11 : नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सहभागी करून घेत चंद्रभागेच्या दोन्ही काठावर आंबा,पेरूसीताफळचिंचजांभूळ यासारख्या फळझाडांची लागवड करण्याचा शासनाचा मानस असून यादृष्टीने पुणे विभागीय आयुक्तांना एक सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात आज जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व त्यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना संस्थेमार्फत काढण्यात येणाऱ्या यात्रेची माहिती दिली. त्यांच्याशी चर्चा करताना श्री. मुनगंटीवार बोलत होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, शेकडो वर्षापासून चंद्रभागा नदी ही वारकऱ्यांसाठी केवळ नदी किंवा पाण्याचा स्त्रोत नाही, तर ती त्यांच्यासाठी पवित्र तीर्थ आहे. या नदीच्या शुद्धतेसाठी शासनाने नमामि चंद्रभागा अभियान हाती घेतले आहे. यामध्ये महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे आनंद महिंद्रातामिळनाडूच्या जग्गी वासुदेवन यांची ईशा फाऊंडेशन ही संस्था सहभागी होत आहे. नमामि चंद्रभागा या अभियानात सुरुवातीपासूनच जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह हे देखील सहभागी झालेले आहेत. चंद्रभागा नदीची शुद्धता व्हावीनदी प्रदुषण कमी होऊन लोकांमध्ये जलसाक्षरता वाढावीया माध्यमातून नद्यांचे पुनरूज्जीवन व्हावे यासाठी श्री. सिंह यांची जलबिरादरीमहाराष्ट्र ही संस्था दि. २४ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत जलयात्रा काढत आहे, ती निश्चित कौतुकास्पद आहे.

जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी श्री. मुनगंटीवार यांच्या पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष लागवडीच्या ध्यासाचे  कौतुक केले. ते म्हणालेनमामि चंद्रभागा अभियानात लोकांचा सहभाग वाढावालोकांमध्ये नदी शुद्धीकरणाची व्यापक जनजागृती व्हावी म्हणून त्यांची संस्था दि. २४ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत जलयात्रा काढत आहे. भीमाशंकर येथून सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप कर्नाटकातील विजापूर येथे होईल. तिथे नदी पुनर्जीवन या विषयावर एक राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती ही श्री. सिंह यांनी यावेळी दिली. या यात्रेच्या शुभारंभ आणि समारोपाच्या कार्यक्रमाबरोबरच यात्रेत अन्य ठिकाणीही अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर श्री. मुनगंटीवार यांनी तत्काळ होकार दिला तसेच ही यात्रा यशस्वी होण्यासाठीया माध्यमातून नदी पुनरूज्जीवननदीच्या शुद्धतेचा आणि स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे देता यावा यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत शासन नक्की करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*